पवारांनी निर्णय घेत भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली, आता त्यांना निवडून द्या – अजित पवार

Ajit Pawar-Sharad Pawar-Bhagirath Bhalke

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur-Mangalvedha Assembly by-election) प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचं आवाहन पंढरपुरातील मतदारांना केलं. पवार साहेबांनी (Sharad Pawar) शेवटी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतला. मी आतापर्यंत कोणत्याच मतदारसंघाला एवढा वेळ दिलेला नाही. या काळात मी आनेकांच्या भेटी घेतल्या. जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सुद्धा या भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या, असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

राज्यातील साखर कारखान्यांचे प्रश्न महाविकास आघाडीच (Mahavikas Aghadi) सोडवू शकते. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कारखाने मी स्वत: संचालक म्हणून निवडून देणार, असा दावाही अजितदादांनी यावेळी केला. आजची ही सभा सांगता सभा नाही तर विजयाची सभा असल्याचं सांगत भगीरथ भालके यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही अजित पवार यांनी यावेळी केला.

अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनाटोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का? भाजप ग्रामीण भागातील प्रश्न सोडवू शकत नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेतून पक्ष वाटचाल करत आहे. शेतकरी जगला तरच राज्य जगेल. विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात. पण तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय दिलं? असा सवाल अजितदादांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते की चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास करु, पण कोरोनाचं संकट आलं. खरं तर ही निवडणूक व्हायला नको होती. पण भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याचं झालं. अनेक नेते सोडून गेले. भारत भालके आपल्याला सोडून गेले. राजूबापू पाटील आपल्याला सोडून गेले. डबल निधी देतो, असं आश्वासनही अजित पवारांनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button