अहमदनगरचा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी पवारांना साकडे

Sangram Jagtap - Sharad Pawar

अहमदनगर : राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम रस्त्याची नगर शहर व भिंगार परिसरामध्ये दुर्दशा झाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व बांधकाम विभागाकडे दोन वर्षांपासून पडून आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा, यासाठी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना साकडे घातले आहे. आ.जगताप यांनी मुंबईत जाऊन खा.शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात आ.जगताप यांनी शरद पवार यांना निवेदन दिले आहे.

आ.जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या एन.एच .६१ ( जुना नं . २२२ ) या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतुक, बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे. हा सदरचा रस्ता शहर हद्दीतून जात असल्याने सदरचा रस्ता होणे अत्यंत आवश्यक आहे.

या रस्त्याचा प्रस्ताव चीफ इंजिनियर नॅशनल हायवे पी.डब्लु.डी. कोकण भवण , मुंबई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते वाहतुक यांना पाठविलेले आहे. तरी सदरचे काम मंजूर करण्यासाठी मा.केंद्रीयमंत्री,सार्वजनिक बांधकाम यांना आपण शिफारस करावी , अशी विनंती मी पवार साहेबांना यावेळी केली. अशी माहिती जगताप यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER