शरद पवार पुन्हा मैदानात, गणपती दर्शनाच्या निमित्ताने पवार-ठाकरे कुटुंब एकत्र

Pawar-Thackeray family together

मुंबई : कोरोना (Corona) साथीच्या आजारामुळे यंदा अगदी साधेपणाने, शांतपणाने पार पाडत बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. तत्पूर्वी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पवार कुटुंबीयांनी भेट दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान होताच पवारांनी स्वतःहून घरीच राहण्याच्या निर्णय घेतला होता. जवळपास १० दिवसांनंतर ते घराबाहेर पडले. काल शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule), जावई आणि नातीनीसह मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान गाठले. यावेळी ठाकरे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. संपूर्ण पवार कुटुंबीयांनी बाप्पांचे दर्शन घेऊन वर्षाबाहेर पडले. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते. दरम्यान, आता शरद पवार पुन्हा सक्रिय होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER