आघाडी सरकारमध्ये पवारांचा बोलबाला, राज ठाकरेंना राज्यपाल म्हणाले ‘पवारांशी बोलून घ्या’

Governor Bhagat Singh Koshyari - Sharad Pawar - Raj Thackeray

मुंबई :- वीज बिल कमी करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेटीनंतर व्यक्त केली. ते पत्रकारांशी बोलत होते. मात्र यावेळी त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यपालांनी वीज बिल कमी करण्यासंदर्भात पवारांशी बोलून घ्या, सांगितल्याची माहिती दिली. यावरून कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी पवारांचा निर्णय हा अंतिम असतो का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचाच बोलबाला असल्याचेही दिसून येत आहेत.

मी इथे प्रश्नोत्तरासाठी आलेलो नाही. लोकांना येत असलेल्या वीजबिलासंदर्भात मी चर्चा केली. वाढीव वीजबिलाच्या विषयावरून गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि माझे सैनिक आंदोलनं करीत आहेत. सर्व जण येऊन भेटून गेलेत. लोकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितलं, पण अजून तो होत नाही. राज्यपालांशी यासंदर्भात बोललो. ते म्हणाले एकदा शरद पवारांशी बोलून घ्या. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटतं हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. लोकांना जिथे २००० बिल येत होतं तिथे १० हजार बिल येत आहे. राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण तर कशामध्ये हे प्रकरण अडकलंय ते माहिती नाही. असा टोलाही राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर लगावला.

वाढीव वीज बिलाचा हा प्रश्न राज्य सरकारला जर माहिती आहे, वाहतूक कोंडी वाढली आहे, ट्रेन कधी सुरू होणार, रेस्टॉरंट उघडली आहेत, मंदिरं सुरू नाहीत, धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगा, असंही म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

ही बातमी पण वाचा : राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार : राज ठाकरे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER