‘पडत्या काळात सोडून गेलेल्यांना पवारांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली’

Sharad Pawar

मुंबई : रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केव्हाही शरद पवार नगरच्या दौऱ्यावर असत त्यावेळी त्यांच्या दिमतीला भक्कमपणे उभे राहणारे माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) हे हमखास दिसून यायचे. मात्र यावेळी त्यांच्या सोबतीला दिसले नाही. त्याच कारण म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. आणि ही बाब पवारांच्या मनात अजूनही खटकत आहे, हे त्यांच्या कालच्या भाषणावरुन स्पष्ट झाले.

मधुकर पिचड हे शरद पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. राष्ट्रवादी काँग्रेसची 1999ला स्थापना झाली. त्यावेळी पवारांसोबत मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक राहिले. पवारांनी पिचड यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. राष्ट्रवादी सत्तेत असताना पिचड कायम लाल दिव्यात राहिले. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणात पडझडीला सुरूवात झाली. यापुढे राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही, अशी शंका आल्याने अनेक मात्तबर नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली. पडत्या काळात अनेकांनी साथ सोडूनही पवार डगमगले नाही. मात्र खांद्याला खांदा लावून बसणारे, अनेक पदे देऊन त्यांचा योग्य सन्मान करुनही मधुकर पिचड आपल्याला सोडून जातील अशी कल्पनाही शरद पवार करु शकले नव्हते. मात्र प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पिचड यांनी आपल्या मनगटावरचं राष्ट्रवादीचं घड्याळ काढून भाजपचा उपरणं आपल्या खांद्यावर घेतलं. आणि हीच बाब पवारांना दुखावून गेली. त्या दुःखाची सल आजही पवारांना आहे हे कालच्या भाषणातून उघड झाले.

आपण 1980 मध्ये 56 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. कामानिमित्त इंग्लडला गेलो, तर इकडे 50 आमदार फुटले. सोबत फक्त 6 आमदार राहिले, मात्र मी स्थिर होतो. सोडून गेलेल्या 50 पैकी 48 आमदार पराभूत झाले. पिचड यांच्याबाबतही तेच झाले. मधुकर पिचड यांना मंत्री केले, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता केले, मात्र ते मला सोडून गेले व पराभूत झाले. येथील पहिल्या परिवर्तन सभेतच लोकांच्या मनात काय चालले, ते मला समजले होते, असा टोला लगावत पवार यांनी पडत्या काळात सोडून गेलेल्यांना शरद पवारांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER