पवारांनी मला शिकवू नये; चंदक्रांत पाटलांचा टोमणा

Chandrakant Patil - Sharad Pawar

सांगली :- मुंबई येथे शरद पवार (Sharad Pawar) यांना चंद्रकांत पाटलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पवार यांनी – ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे राहायला जावे लागते, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू? असे म्हणून पाटील यांची टिंगल केली. यावर चंद्रकांत पाटलांनी, पवारांनी मला शिकवू नये, असे उत्तर पवारांना दिले.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेची निवडणूक कोल्हापूर सोडून पुणे येथून लढवली याचा संदर्भ देऊन पवार यांनी, ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे राहायला जावे लागते, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू? असे म्हटले. याच्या उत्तरात पाटील यांनी पवार यांच्या माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय बदलल्याचा संदर्भ देऊन – माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करून नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, असे म्हटले.

ते म्हणालेत, मला गाव सोडून जावे लागले असे शरद पवार म्हणालेत. पवारांना माढामधून लढावे लागले. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडावे लागले. पक्षापेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करून नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये.

ही बातमी पण वाचा : …त्यांनी न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? शरद पवारांनी व्यक्त केली शंका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER