मराठा आरक्षणासाठी पवारांनी सर्वाना एकत्र आणावे, विनायक मेटेंची विनंती

vinayak-Mete

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation ) मुद्द्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी आज महत्वाच्या अश्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नाही. 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी आहे. जर सरकारची हीच भूमिका राहिली तर मराठा समाजाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारला माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं.

या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना निमंत्रित केलं गेलं आहे. 3 पक्षाचं सरकार एकत्र येत असेल तर मराठा समाजानेही एकत्र यायला हवं. जर आम्ही एकत्र आलो नाही तर समाजाप्रतिचं कोरडं प्रेम दिसून येईल, असं मत मेटे यांनी व्यक्त केलं.

सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला एकत्र येऊ देत नाही. जे लोक आज बैठकीला येणार नाहीत. त्यामागे सरकार जबाबदार असेल. आजच्या बैठकीत कोण आले आणि काय झालं? याबाबत दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्यात येईल, असंही मेटे म्हणाले.

मराठा समाजातील नेते एकत्र येत नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: बोलले. त्यामुळे कुणाचं किती ऐकायचं हे ठरवा. मराठा समाजातील नेते एकत्र आले नाहीत, तर समाजाचं नुकसान होणार असल्याचं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष घातलं तर बर होईल. पवारांनी देशातील इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलं. पण मराठा आरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केलं. 25 जानेवारीपूर्वी त्यांनी लक्ष घालावं. सगळ्यांना एकत्र आणत नवी रणनिती आखावी, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER