पवार-शहांची भेट : नव्या पिढीला हे राजकारण कळणार नाही- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

ठाणे : शरद पवार (Sharad Pawar) आणि अमित शाह (Amit Shah) यांची २६ मार्चला अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाली. यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात रान उठवले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या मुद्द्यावरून भाजपचे नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची भाषाही करत आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केले आहे. या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही, असे ते म्हणाले. “शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली, तर तुमचे गुप्तहेर कोण होते हे माहीत नाही. ५० वर्षांच्या राजकीय जीवनात कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी मित्र कमावले नाहीत, तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत.

मग त्यात कश्मीरचे फारूक अब्दुल्ला, ओडिशातील विजू पटनाईक असो बंगालमधले जोत्या बसू असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिले आहेत. भाजप नेते प्रमोद महाजन यांच्याशी शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. या राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो.” अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button