पवार-शहा भेट; शहांना जे सुचवायचे होते ते सुचवलं, दरेकरांची सूचक प्रतिक्रिया

Pravin Darekar

मुंबई : अहमदाबाद येथील एका फार्महाऊसवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे (BJP) दिग्गज नेते अमित शहा (Amit Shah) यांच्यात गुप्त भेट झाल्याचे वृत्त माध्यमांवर झळकले आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी शिजतंय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. कालपर्यंत राष्ट्रवादीवर सडकून टीका करण्याऱ्या भाजपकडून सावध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचे नमूद केले. महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसून आता घालमेल बाहेर येत आहे. केवळ नशीबाच्या जोरावर फार काळ सरकार चालवता येत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील शाब्दिक चकमकीचा दाखला दिला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे सरकार आमच्या टेकूवर उभे आहे, असे बजावून सांगितले आहे. तर अजित पवार यांनी महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नये, असा इशारा आपल्या मित्रपक्षातील नेत्यांना दिला आहे. या सगळ्यातून सरकारमधील अस्वस्थता समोर येत आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांनी अमित शाहा यांच्या वक्तव्यावर फार काही बोलण्यास नकार दिला. अमित शाह आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना काय सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीची बातमी नाकारली आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढल्याचे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button