पवार-शहा भेट शिवसेनेसाठी घातक; आमच्यासाठी पोषक – नारायण राणे

Narayan Rane - Amit Shah - Sharad Pawar

मुंबई :- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे (BJP) दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यात गुजरातमधील अहमदाबाद येथे भेट झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप येईल, असेही बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादीकडून या भेटीचं खंडन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे खुद्द अमित शहा यांना या भेटीबाबत प्रश्न विचारला असता सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असे म्हणून सस्पेन्स वाढवला आहे. मात्र नारायण राणे यांनी कथित भेटीवर विधान करत शिवसेनेची (Shiv Sena) चिंता वाढवली आहे.

आज मुंबईत नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली असता त्यांना पवार-शहा भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीबाबत मला माहिती नाही. मात्र जर भेट झाली असेल तर ती नक्कीच राजकीय मुद्द्यावर झाली असेल. याबाबत आमचे वरिष्ठ नेते माहिती देतील. काल मी शरद पवारांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. ते रुग्णालयात उपचार घेत असल्याने भेटीबाबत विचारणे योग्य वाटले नाही. मात्र जर त्यांच्यात भेट झाली असेल तर ती शिवसेनेसाठी घातक असेल आणि आमच्यासाठी व महाराष्ट्रासाठी पोषक ठरेल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या चिंतेत भर टाकली आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले, नारायण राणेंचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button