माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं भाग्य समजतो – प्रविण दरेकर

Sharad Pawar-Praveen Darekar

मुंबई :- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने (Delhi Farmers agitation) देशातील आमि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काल हिंसक वळण आल्याने विरोधीपक्षनेते आपली भूमिका मांडताना शेतक-यांच्या आंदोलनावर शंका व्यक्त करत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Praveen Darekar)यांनीही या आंदोलनावर शंका उपस्थित केली त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दरेकरांचे नाव घेऊन त्यांच्या शंकेवर टिप्पणी केली. आता प्रविण दरेकर यांनीही पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

“माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. वर्षभर महाराष्ट्र अडचणीत असताना राज्य सरकार राजकारण करत होतं, परंतु त्याकाळात विरोधी पक्षनेता म्हणून विधायक दृष्टीने मी काम केलं”, असं दरेकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “वस्तूस्थिती मांडणं हा काय दोष आहे का? शेतकरी मोर्चात भेंडी बाजारमधील भगिनी कशा? हे केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. मी आधार असलेलं वक्तव्य केलेलं आहे, कोणाच्या सांगण्यावरून बोललो नाही” असं स्पष्टीकरण प्रविण दरेकर यांनी दिलं आहे.

शरद पवार काय म्हणाले –

शेतकरी आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

ही बातमी पण वाचा : भाजपला ‘दे धक्का’, पवारांच्या हस्ते शिवेंद्रराजेंसह अनेक आमदारांचा लवकरच पक्षप्रवेश 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER