पवारसाहेब ! …तर सारथी जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची – संभाजीराजे

Sambhaji Raje

पुणे :- मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, सारथी संस्थेमार्फत राबविला जाणारा  ‘तारादूत’ प्रकल्प बंद पडला आहे. यासाठी शरद पवार आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करताना खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना आव्हान दिले – छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे.

तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करा, या मागणीसाठी पुण्यातील सारथी कार्यालयाबाहेर सहा दिवसांपासून सेवक बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. खासदार संभाजीराजे यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

संभाजीराजे म्हणाले की, “सारथी संस्थेतर्फे तारादूत प्रकल्प राबविला जात होता. तो प्रकल्प मागील कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्या प्रकल्पात काम करणार्‍या सेवकांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सारथी संस्थेबाहेर सेवक ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेतली नाही. या संदर्भात मी लवकरच शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची भेट घेणार आहे.

शरद पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा. ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था सुरू केली आहे त्याकडे कोणाचे लक्ष नाही. शरद पवार साहेब, आपण छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, सारथी संस्थेला स्वायत्तता देणार, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता. दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विभागाने सारथी संस्थेला स्वायत्तता प्रदानदेखील केली. मात्र सारथीचे अधिकारी कलम २५ च्या माध्यमातून आम्हाला स्वायत्तता असल्याचे सांगत आहेत. मग कसली स्वायत्तता दिली? असा सवाल उपस्थित करीत या आंदोलनकर्त्यांसाठी रस्त्यावर पुन्हा उभे राहावे लागेल, असा इशारादेखील त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER