पवारसाहेब, एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंनी केली शिवसेनेची टिंगल

मुंबई : स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचं वाक्य गेल्या ३० वर्षांपासून ऐकतो आहे, असे राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad pawar)म्हणाले. त्यावरून भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी – मानलं पवारसाहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवारसाहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानफटीत पण दिली ! असे ट्विट करून शिवसेची टिंगल केली आहे.

त्याआधी भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनीही एक ट्विट करून शिवसेनेला टोमणा मारला – हा घ्या घरचा आहेर! ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सने जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री १० वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालली.

शरद पवार

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. पवारांनी सेनेला काढलेल्या चिमट्याची राजकीय वर्तुळात चर्चा होते आहे. याच पार्श्वभूमीवर भातखळकर यांनी ट्विट करत सेनेला टोमणा मारला.

 बातमी पण वाचा : शरद पवारच राज्य चालवत आहेत ; चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER