पवारसाहेब मुल्लाला आवरा ! खुनाला उत्तर खुनाने देणे योग्य होणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray - Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई :- मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचा संशय ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर व्यक्त केला जात आहे. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असेल तर हे बरोबर नाही. या प्रकरणात सरकार काय करतेय ते पाहणारच आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य दिसणार नाही, असा इशारा देतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटून नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मनसेचा पक्षाचा पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणाचा उत्तरप्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी कबुली जबाब दिला असून यात ठाण्यातील राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तरप्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असं या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. सत्ताधारी लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे.

आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असं राज म्हणाले. याबाबत शरद पवारांची भेट घेणार आहे. अशी मंडळी यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हातही बांधलेले नसतात. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या तर हे चित्र चांगले दिसणार नाही.  नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी पवारांची  भेट घेणार, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांनाही टोला लगावला. राज्यात लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे सर्वच बंद आहे. सर्व म्हणजे सर्व बंद आहे. त्यात रेस्टॉरंट वगैरे आलेच. देशमुखांचे बारही बंद आहेत, असा चिमटा राज यांनी काढताच एकच हशा पिकला.

ही बातमी पण वाचा : ‘अनिल देशमुख महत्वाचे नाही, सरकार पडण्यासारख्या गोष्टी घडतायेत’ – राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button