अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मोफत सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचे रोहित पवारांकडून कौतुक

Rohit Pawar Praises Autorickshaw Driver

पुणे :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या कठीण काळात कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाहीत. पण असे काही लोक आहेत ते या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून आले. कोरोनाबाधित रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांना गरजेच्या वेळीच वाहन मिळत नसल्याचं पाहून निगडीतील राहुल शिंदे या रिक्षाचालकने विनामूल्य सेवा दिली.

यावर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्या रिक्षाचालकाचे  तोंड भरून कौतुक केले आहे. मोठेपण हे तुमच्याकडील संपत्तीवरून ठरत नाही तर समाजाप्रती असलेल्या दायित्वाच्या भावनेवरून ठरत असते. पिंपरी-चिंचवड येथील रिक्षामालक राहुल शिंदे यांनी कोरोना रुग्णांना मोफत रिक्षासेवा देऊन आपले  मोठेपण सिद्ध केले . त्यांच्या या कामाचा मनापासून अभिमान वाटतो. त्यांचे खूप खूप अभिनंदन! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

दरम्यान वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्णांची तसेच नातेवाइकांची गैरसोय होताना मी पाहिलं आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून पाच रिक्षाच्या माध्यमातून ही विनामूल्य सेवा आम्ही देत आहोत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. एक रिक्षाचालक म्हणून आम्ही त्यात खारीचा वाटा उचलत आहोत, असे राहुल शिंदे या रिक्षाचालकाने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button