‘पवारांनी विषय राष्ट्रीय केला’, फडणवीसांचा पवारांना चिमटा

devendra-fadnavis-sharad-pawar

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. अनिल देशमुखांनी दर महिन्याला १०० कोटींचे टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांडॉक्टरांनी दिला असल्याची माहिती दिली होती. मात्र ही माहिती देताना त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला होता. आणि हाच धागा पकडून विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांना चिमटा काढला.

शरद पवारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही प्रश्नही उपस्थित केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी आज फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद सुरु करण्यापूर्वी त्यांनी उपस्थित पत्रकारांची माफी मागत सांगितलं की, महाराष्ट्र भाजपच्या प्रथेप्रमाणे पत्रकार परिषदेची सुरूवात मराठीतून केली जाते. मात्र पवारांनी हा विषय राष्ट्रीय केल्याने आम्हाला प्रथा बदलावी लागत असल्याचे म्हणत त्यांनी पवारांना चिमटा काढला.

ही बातमी पण वाचा :  हे नेमके कोण? फडणवीसांनी पवारांचा दावा खोडून काढला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER