खडसे, शेट्टींना दिलेला शब्द पवारांनी पाळला, भिंगेना संधी देत एकाच दगडात दोन निशाणे

Sharad Pawar - Eknath Khadse - Yashpal Bhinge

मुंबई : अखेर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse), राजू शेट्टी (Raju Shetti), गायक आनंद शिंदे (Anand Shinde) आणि यशपाल भिंगेंना (Yashpal Bhinge) विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी संधी दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकाच दगडात वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधत दोन शिकार केले आहे.

यशपाल भिंगे हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. ते नांदेड मंधील मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ ची लोकसभा निवडणूक नांदेडमधून लढवली होती. या निवडणुकीत यशपाल भिंगे यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या यशपाल भिंगे यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी करुन राष्ट्रवादी काँग्रेसनं एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. यशपाल भिंगे यांच्या रुपात वंचितचा एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागणार आहे. तर, यशपाल भिंगे यांना धनगर समाजाच्या प्रश्नांची जाण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

भाजपनं धनगर समाजाचे (Dhangar Community) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना विधान परिषदेवर संधी देत आमदार बनवले आहे. यशपाल भिंगे यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसनही धनगर समाजाची पार्श्वभूमी असणारा नेता विधान परिषदेत पाठवला आहे. एकेकाळी वंचितमध्ये एकत्र असणारे हे दोन्ही नेते विधानपरिषेत एकमेकांच्या विरोधी बाकांवर पाहायला मिळतील.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे यांना कला क्षेत्रातून संधी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER