‘पवार इज पॉवर’, शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही – एकनाथ खडसे

Sharad Pawar- Eknath Khadse

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचे (Sharad pawar) आभार मानले आहेत. अनेकांनी मला विचारणा का केली, की तुम्ही राष्ट्रवादी का निवडली? बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम शरद पवार यांनी केलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही. पवार इज पॉवर. पवारांनी मुख्यमंत्री असताना मैलाचे दगड व्हावे, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी 90 मध्ये त्यांच्यासोबत काम केले. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत गौरवोद्गार काढले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय बैठकीत बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार रिक्षा म्हणून भाजपचे नेते टीका करतात. मग, अटलजींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले. भाजप मी सोडली नाही तर मला भाजपने बाहेर ढकलले. मागच्या काळात माझा अपमान झाला, डावलले गेले, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. भाजप त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी सरकार पडणार असल्याचे दावे करण्याचे उद्योग करत आहे. मी तिकडे असताना हे उद्योग केले आहेत, आमदार सांभाळण्यासाठी ते करावेच लागते. लाल दिव्याच्या गाड्या 50 आणि आश्वासने 200 अशी ही परिस्थिती आहे, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

तसेच, खडसे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्याचे काम शरद पवारांनी केले. हे कधीही न होण्यासारखे काम होते. ते पवारांनी शक्य केले. भाजपला बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. सरकार पडेल ही भाजपची भूमिका, पण वर्ष झाले अजून काहीही घडलेले नाही. सत्तेत येण्यासाठी भाजपला एका पक्षाचे पूर्ण समर्थन हवे आहे. एखादा पक्ष तिकडे गेल्याशिवाय भाजपचे सरकार येऊच शकत नाही. उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री पदावर काम करतील का? मग शिवसेना तिकडे जाणारच नाही. काँग्रेस उभ्या हयातीत भाजपसोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा विषयच नाही. एकदा भाजपने प्रयत्न केला. पण काय झाले? याचा त्यांना चांगला अनुभव असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER