बंगालमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी पवार ऍक्शन मोडवर, विरोधकांची मोट बांधण्यात यशस्वी

Sharad Pawar

नवी दिल्ली :- सर्व राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी यासाठी नेहमीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पुढाकार घेतलेला आहे. मात्र सर्व जागाच लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये युती झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत एकट्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. अश्यातच एकट्या पडलेल्या ममतांच्या मदतीसाठी शरद पवार (Sharad Pawar) धावून आले आहे. या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी पवार विरोधकांना एकत्र करण्यात यशस्वी झाले आहेत.

शरद पवारांच्या प[पुढाकाराने आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शरद पवारांसह विरोधी पक्षातील बरेच ममता बॅनर्जींच्या पक्षासाठी प्रचारात उतरणार आहे. शरद पवार यांच्यासह झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ति मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राष्ट्रीय जनता दल) नेते तेजस्वी यादव हे प्रचार करणार आहेत. तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचा तारखा आधीच ठरवण्यात आल्या आहे.

बंगालमधील हाय व्होल्टेज विधानसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध ममता असा सामना रंगला आहे. असे असताना देशातील भाजपविरोधी राजकीय ताकद बॅनर्जी यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. ते कॉंग्रेस-डाव्या-आयएसएफ युतीपेक्षा टीएमसीला पाठिंबा देत आहेत. डाव्या पक्षांनी अनेकदा राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेससोबत युती केली आहे, तर भाजपप्रणित एनडीए विरुद्ध राष्ट्रवादी, जेएमएम, आरजेडी, सपा सारख्या छोट्या पक्षांनी कॉंग्रेसला मदत केली होती.

ही बातमी पण वाचा : ममता बॅनर्जींच्या अपघात प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER