पवारांच्या हस्ते नाशिकच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन, सर्वाना केले भावनिक आवाहन

Sharad Pawar - Maharastra Today

नाशिक : शहरातील वाढत्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,समता परिषद व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कोविड सेंटरचे उद्घा‌टन आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पवार यांनी कोरोना महामारीला लढा देण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन केले.

आज महाराष्ट्रावर मोठे संकट ओढवले आहे. त्यावर मत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार, विरोधी पक्ष आणि काही संस्थांची मदत मिळत आहे. मात्र हे संकट दूर करण्यासाठी आणखी लढा देण्य्ची गरज आहे. यासाठी सर्वानी आपले आचारविचार बाजूला सारून एकत्रित पाने लढा देऊ यात, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८० ऑक्सिजन बेडस असलेले नाविन्यपूर्ण कोविड केअर सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे राहत आहे. या कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोविड केअर सेंटरसाठी डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ५ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे ९ डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच एक ॲडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वाॅर्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button