सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवारांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय – देवेंद्र फडणवीस

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar - Devendra Fadnavis

बारामती : सरकारच्या नाकर्तेपणामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा बचाव करावा लागत आहे, अशी जहरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बारामतीत केली. सध्या शरद पवार यांना दररोज सरकारच्या बचावासाठी पुढे यावे लागत आहे. कारण, या सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. अतिवृष्टीनंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री मुंबईतच बसून होते. आमचे दौरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून आपापल्या मतदारसंघासाठी रवाना झाले. असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज तुळजापुरातील पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली होती. प्रशासकीय निर्णय वेगाने घेण्यासाठी आम्हीच मुख्यमंत्र्यांना मुंबईत बसून नियोजन करण्याची विनंती केली आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंतीही आम्ही त्यांना केली होती. ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागते. माझ्या हातात प्रशासकीय जबाबदारी नाही, त्यामुळे मी फिरत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर फडणवीस यांनी पवारांना चिमटे काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER