पवार साहेबच बार धार्जिणे असल्याने त्यांचे बारचालकांवर विशेष प्रेम ; भाजपच्या तुषार भोसलेंची टीका

Maharashtra Today

मुंबई : राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता सर्व व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यवसाय आणि बार यांनाही याची झळ बसली असून, या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले .

सरकारचे निर्माते असलेले पवार साहेबच बार धार्जिणे असल्याने या सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारचालकांवर प्रेम आहे अशी टीका भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी केली.

पवार साहेबांना हातावर पोट असलेले मजूर, लोककलावंतांची उपासमार, हाल-फुल विक्रेते, शेतकरी , मराठा आरक्षण हे काहीच दिसले नाही असाही आरोप त्यांनी केला. एकीकडे मठ-मंदिरांची विजतोडणी करायची आणि बारचालकांना वीजबील सवलत द्यायची हे चित्र आम्ही सहन करणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.


 

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button