बहुजनांना सोबत आणण्यासाठी पवारांनी दिला छत्रपती-होळकर विवाहाचा दाखला

Sahard Pawar

पुणे : महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी लावला. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकर कुटुंबात विवाह लावला. आज मात्र समाजात जातीय विषमता निर्माण झालीय. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

ते जेजुरी येथे अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलते होते. ते म्हणालेत, अहिल्यादेवींनी इतिहास घडवून स्त्री शक्तीचे महत्त्व समाजाला दाखवले. त्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेने येथे येतात. या प्रांगणात येणाऱ्यांना हा पुतळा प्रेरणा देईल.

जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी एक

अहल्याबाईंची ओळख त्या काळात जगभरात होती. त्यांची तुलना रशियाची राणी, ब्रिटेनच्या राणीशी करण्यात आली. अहल्याबाई जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी होत्या. इंग्लिश लेखकाने त्यांचं हे मोठेपण अधोरेखित केले आहे. अहल्याबाईंनी शेतकऱ्यांना न्याय दिला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले, असे पवार म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER