पवारांनी विधानसभेचे तिकीट दिले; पण… नमिता मुंदडा यांची डॅशिंग कारकीर्द

Namita Mundada

मुंबई :- बीडमधील (Beed) केज विधानसभा क्षेत्राच्या भाजप (BJP) आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांचा आज (४ मार्च) वाढदिवस. दिवंगत नेत्या विमल मुंदडा (Vimal Mundada) यांच्या सूनबाई असलेल्या नमिता यांची राजकीय कारकीर्द नुकतीच सुरू झाली. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकांसाठी नमिता मुंदडा यांना तिकीट जाहीर केले होते. परंतु ऐनवेळी बंडखोरी करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या डॅशिंग आमदार नमिता मुंदडा यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर.

गेल्या वर्षी गर्भवती असतानाही नमिता मुंदडा आठव्या महिन्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावत असत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंदडा पहिल्या दिवसापासून उपस्थित राहायच्या. यंदाही विधिमंडळात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं.

कोण आहेत नमिता मुंदडा ?

नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. शरद पवारांनी बीडमध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या विधानसभा उमेदवारांमध्ये मुंदडा यांचा समावेश होता. परंतु ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की पवारांवर आली होती.

  • नमिता मुंदडा या बीडमधील केज मतदारसंघातून भाजप आमदार
  • २०१४ ला भाजपच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांनी ४२ हजार ७२१ मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात नमिता मुंदडा या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या.
  • नमिता मुंदडा दिवंगत विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत.
  • दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा या सलग पाच वेळा केज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
  • विमल मुंदडा यांनी भाजपातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
  • भाजपकडून दोनदा आणि राष्ट्रवादीतून तीनदा त्या निवडून आल्या. तसेच नऊ वर्षे त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER