वसुबारस : पवार कुटुंबीयांनी केले गौ-पूजन

पवार कुटुंबीयांनी केले गौ - पूजन

बारामती :- दरवर्षी दिवाळी (Diwali) पाडव्यानिमित्त होणारा पवार कुटुबीयांच्या भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. कोरोनाच्या साथीमुळे पवार कुटुंबीयांनी हा निर्णय जाहीर केला. आज बारामतीत पवार कुटुंबीयांनी कौटुंबिक दिवाळी साजरी करणे  सुरू केले. वसुबारसनिमित्त बारामती अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील सेंटर फॉर एक्सलन्स इन डेअरीच्या फार्मवर गौ-पूजन करण्यात आले.

गुरुवारी (दि. १२)  माळेगाव येथील अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमधील सेंटर फॉर एक्सलन्स इन डेअरीच्या फार्मवर प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. रजनी इंदुलकर, सुनंदा पवार, शुभांगी पवार, कुंती व अन्य महिलांनी गौ-पूजन केले.

फार्मवरील या केंद्रांत भारतीय पारंपरिक गाई व जगभरातील वेगवेगळ्या प्रजातींच्या गाईंवर संशोधन केले जाते. वसुबारसच्या मुहूर्तावर काही नव्या गाई इथे आणल्या आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोशल मीडियावर छायाचित्रांसह पोस्ट करत ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER