गोविंदबागेत पवार कुटुंबीयांनी साजरा केला पाडवा

Diwali-Padwa-Pawar-Family-Celebration-1

पुणे : दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र जमले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत सहकुटुंब दिवाळी पाडवा साजरा केला.

यावेळी प्रतिभा पवार यांनी शरद पवार यांचे औक्षण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांनी ओवाळले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांचे औक्षण केले. आमदार रोहित पवार यांना कुंती पवार यांनी ओवाळले.

पाडव्याचा सण साजरा केल्यानंतर पवार कुटुंबीयांनी गोविंद बागेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER