पवारसाहेब, तुम्ही काही करू नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत; निलेश राणेंचा टोला

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या कठीण परिस्थितीत ठिकठिकाणी बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) ऑक्सिजन देण्यासाठी काही तरी करा, असं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील साखर कारखान्यांना पत्र लिहीत ऑक्सिजन निर्मितीसाठी पत्र लिहिले आहे. मात्र यावरून त्यांच्यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार ऍक्शन मोडवर, साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

साहेब, आपण काही करू नका, महाराष्ट्राचे डॉक्टर्स आणि या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोपही राणेंनी यावेळी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button