पवारांनी फेसबुकचा डीपी बदलला, कृषी कायद्याविरोधात मोठी रणनीती आखल्याची चाहूल

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या फेसबुक (Facebook) पेजवर डीपी बदलला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावली आहे. शेतकरी आंदोलनाला राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि इतर नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं यासाठी त्यांनी सोशल मीडियावर अभिनव पद्धतीने लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर लाखो नागरिक सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचवण्याचा उद्देश शरद पवार यांचा असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोध पंजाब आणि हरियाणाचे शेकडो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाम मांडून बसले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरीदेखील एकवटले आहेत. ‘संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा’ या झेंड्याखाली राज्यातील 100 हून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत. मुंबईत 24 ते 26 जानेवारी रोजी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत. येत्या 25 जानेवारीला आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला त्यांची उपस्थिती राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी कृषी कायद्याविरोधात मोठी रणनीती आखली तर नसावी ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER