‘पवार नेकीने वागतात, मग धनंजय मुंडे प्रकरणात गप्प का? – चंद्रकांत पाटील

Sharad Pawar - Dhananjay Munde - Chandrakant Patil

पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या लग्नाबाह्य संबंधांची कबुली दिली आहे. याशिवाय त्यांनी करुणा शर्माच्या (Karuna Sharma) मुलांना डांबुन ठेवल्याचाही आरोप आहे, इतक्या प्रकरणानंतरही पवार गप्प का? असे खडे सवाल भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना केले आहेत.

एवढेच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे. एक जण बंगल्यावर नेऊन मारतो, दुसरा पोलिसांना मारतो, तिसरा बलात्कार करतो. हे सरकार जनतेने निवडून दिलं नाही, म्हणून उत्तरदायी नाही असं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) वागत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER