खडसेंना मंत्रिपद देण्यास पवारांचा होकार?

Sharad Pawar & Eknath Khadse

जळगाव :  गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) घटस्थापनेला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे त्यांना पक्षात घेतल्यानंतर कुठली जबाबदारी द्यायची यावर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन आठवड्यांपूर्वी चाचपणी केली होती. खडसे हे गेल्याच आठवड्यात मुंबईला जाऊन आले आहेत.

त्याच वेळी खडसे- पवारांच्या भेटीची चर्चा रंगली होती; परंतु प्रत्यक्षात भेट झाली नसल्याचे दोन्ही बाजूंनी  नाकारण्यात आले होते. मात्र, या मुंबईवारीतच खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे सूत्र काय असेल, हे ठरल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रवेशानंतर संघटनात्मक पद, विधानपरिषदेचे सदस्यत्व असे सूत्र यामागे ठरले असून ठाकरे सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांना मंत्रिपद देण्यावर पवारांनी संमती दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER