सहकारी संस्थांच्या निवडणुकांनाचा मार्ग मोकळा

Election

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकांना दिलेली स्थगिती काल (ता. 31) संपली पण याबाबतचा नवा कोणताही आदेश नसल्याने व यापुर्वीच सात जिल्हा बॅंकांसह 38 संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिल्याने उर्वरित संस्थांच्या निवडणुकची प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्याच दरम्यान सहकारासह इतर निवडणुकींना तीन महिन्याची स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत जून 2020 मध्ये संपल्यानंतर पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत सप्टेंबर 2020 मध्ये संपली, पण त्यावेळी कोरोनाचा कमी-अधिक प्रभाव राज्यात असल्याने पुन्हा या निवडणुकांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. तिसऱ्यांदा दिलेली ही मुदतवाढ संपली, पण राज्य शासनाने यासंदर्भात कोणतेही नवे आदेश काढलेले नाहीत.

दुसरीकडे दोन दिवसांपुर्वी सहकार निवडणूक प्राधिकरणाने उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सात जिल्हा बॅंकांसह 38 संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया 4 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकीबाबत राज्य शासनाने सहकार विभागाकडूनही अभिप्राय मागवला होता, त्यात सहकार विभागानेही निवडणूक घेण्याची तयारी दर्शवली होती. या अभिप्रायासह सहकार विभागाचा प्रस्ताव सद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर काल निर्णय अपेक्षित होता, पण नव्याने या प्रक्रियेला स्थगिती न दिल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER