पॉल रायफेल 10 मिनिट आधी निघाले असते तर..!

Paul Reiffel - Maharashtra Today

भारतातील (India) कोरोना (Corona) संसर्गाच्या वाढत्या भीतीपायी आयपीएलमधून काही खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर आॕस्ट्रेलियन पंच पाॕल रायफेल.(Paul Reiffel) यांनीसुध्दा आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता पण ते फक्त 10 मिनीटांनी सुदैवी ठरले अन्यथा त्यांना मायदेशी आॕस्ट्रेलियात तर जाताच आले नसते पण आयपीएलच्या खेळाडू व अधिकाऱ्यांची व्यवस्था असलेल्या बायोबबलमधील सुरक्षित हाॕटेलातही त्यांना परतता आले नसते आणि सेल्फ आयसोलेशनमध्ये राहावे लागले असते.

भारतातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता आॕस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांना 15 मे पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे आपण मायदेशी न परतता भारतातच अडकून पडू या भीतीपायी राफेल यांनी इतर खेळाडूंप्रमाणेच लवकरात लवकर मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता मात्र तरीसुध्दा त्यांना उशीरच झाला. कारण ते आयपीएलच्या सुरक्षित बायोबबल मधून बाहेर पडून परतीच्या प्रवासाला निघणार त्याच्या 10 मिनिटे आधीच त्यांना सांगण्यात आले की दोहामार्गे आॕस्ट्रेलियात परतण्याचा मार्गसुध्दा बंद झाला आहे. त्यामुळे रायफेल यांना भारतातच राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही मात्र जर ते बायोबबलच्या बाहेर पडले असते तर तिकडे त्यांचा प्रवास तर झालाच नसता पण त्यांना बायोबबलमध्येही प्रवेश मिळाला नसता आणि त्यांना आयसोलेशनमध्ये काही दिवस रहावे लागले असते.

त्यांच्या सुदैवाने 10 मिनीट आधीच त्यांना प्रवास करु शकणार नसल्याची सूचना मिळाली आणि आता ते भारतातच अडकून पडले आहेत आणि आयपीएलच्या सामन्यांमध्ये पूर्ववत पंचगिरी करणार असून स्पर्धा संपल्यावरच मायदेशी परतणार आहेत असे वृत्त आॕस्ट्रेलियन माध्यमांनी दिले आहे.

सिडनी माॕर्निंग हेरॉल्डला रायफेल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे दोहा येथून सिडनीच्या फ्लाईटचे तिकिट बूक झाले होतृ आणि अहमदाबाद येथील हाॕटेलातून त्यांची आवराआवर झाली होती पण त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला थांबावे लागले कारण दोहामार्गेची फ्लाईटसुध्दा बंद करण्यात आली आहे. त्याचाआधी काही जण त्यामार्गे आॕस्ट्रेलियात परतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button