पठ्ठ्याने चक्क डोळ्यांवर मास्क लावून झोप काढली !

vijay wadettiwar

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. यात दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा आठ हजारांवर गेला आहे. मुख्यमंत्री नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करतात. अजूनही लोक कोरोना नियमांबाबत गंभीर नाही. मास्क घालणे बंधनकारक असूनही बरेच जण मास्क नाकाच्या खाली किंवा हनुवटीवर ठेवतात.

मुंबईच्या लोकलमध्ये एका व्यक्तीने चक्क मास्क डोळ्यांवर ठेवून झोप काढली. याचा फोटो काढून सोशल मीडियात व्हायरल केला. यावर काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट केला की, “काय चूक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची?” त्यानंतर तांबे यांचे ट्विट मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रिट्विट केले. ते म्हणाले की, “मित्रांनो, असे बेजबाबदारपणे वागू नका! मास्कचा योग्य वापर करा, कमीत कमी स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याकरिता.”

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर- वडेट्टीवार
“राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. सरकारकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. उपाययोजना सुरू असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल हे आपल्याला सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.” असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

त्याचबरोबर मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल, याबाबत विचार सुरू आहे. तसेच लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचाही विचार केला जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER