ऑपेरेशन लोटसवर पटोले यांची प्रतिक्रिया

Nana Patole

मुंबई : रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ‘ऑपेरेशन लोटस’वर चर्चा सुरू झाली. तसेच राजकीय तर्क वितर्क लढवू लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले. राज्यात सत्ता बदलणार नसून देशात बदल होणार आहे. राज्यातील सत्ता पाच वर्षे टिकणार आहेत. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्षाचे नावदेखील राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाना पटोले (Nana Patole) यांचे १२ तारखेला पदभार स्विकारण्याचे कार्यक्रम ऑगस्ट क्रांती मैदानावर होणार आहे.

“नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलले ही नवीन बातमी आहे. कारण ते पंतप्रधान झाल्यापासून संसदेऐवजी सभांमध्येच जास्त बोलतात.” असेदेखील पटोले यांनी मोदींच्या भाषणावरही व्यक्त केले आहे. “जीएसटी कायदा हा मनमोहन सिंह यांनी आणला होता, तो मोदींनी का आणला नाही. महाराष्ट्राला विधानसभा अध्यक्षपदाची निवळणूक बिनविरोध करण्याची परंपरा भाजपने कायम ठेवावी.” मनमोहन सिंह यांचे उदाहरण देत पटोले यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER