सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आता घरातच क्वारंटाइन करणार ; रुग्णालयात बेडचा तुटवडा

COVID -19 - Home Quarantine

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाबाधितांचा दिवसागणिक आकडा 20 हजारांपेक्षा जास्त आहे .

आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढला आहे. सगळ्याच शहरांमधल्या कोविड हॉस्पिटल्समध्ये (COVID Hospital) रुग्ण संख्या वाढल्याने आता बेड्च शिल्लक राहिलेले नाहीत. ICU मध्येही फारच कमी बेड्स शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये आता बेड देण्यात येणार नाहीत.अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये किंवा घरीच क्वारंटाइन (Home Quarantine) राहण्यास सांगितले जाणार असल्याचं आरोग्य विभागाने म्हटले आहे.

दरम्यान राज्यात आत्तापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER