‘पेशंट जागे, खासदार जाग्या, डॉक्टर जागे, आरोग्यसेवक जागे, मग…’ पंकजांचे धनंजय मुंडेंना पुन्हा उत्तर

Maharashtrta Today

राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर (Remdesivir), कोरोना लस (Coronavirus Vaccination) यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विट करत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या ट्विटला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्तर दिले होते.

बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३ हजार २९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवरदेखील होऊ शकतो, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांना परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

‘पेशंट जागे, खासदार जाग्या, डॉक्टर जागे, आरोग्यसेवक जागे, मग… ’ असे उपहासात्मक ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. या ट्विटमध्ये पंकजा यांनी शेअर केलेल्या फोटोत त्या पीपीई कीट परिधान करून कोविड सेंटरमधील रुग्णांची भेट घेण्यासाठी गेल्याचे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button