पतंजलि आयुर्वेद कंपनी उतरणार शेअर बाजारात ?

baba ramdev

योग गुरु बाबा रामदेव यांची पतंजलि आयुर्वेद कंपनी शेअर बाजारात उतरणार असल्याची शक्यता आहे. बुधवारी एका कार्यक्रमात पत्रकारांनी बाबा रामदेव यांना ‘शेअर बाजारात पतंजलिची नोंदणी जास्त भांडवल उभारण्यासाठी करणार का?’ असा प्रश्न विचारला असता एका महिन्याच्या आत या संदर्भातील एक आनंदाची बातमी तुम्हाला देणार, असे त्यांनी म्हंटले. रामदेवबाबांच्या या सूचक विधानानंतर शेअर बाजारातल्या आयपीओ किंवा प्रारंभिक समभाग विक्री बाजारामध्ये खळबळ माजवण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : सिंगापूरच्या उद्योगांसाठी नागपूर, नवी मुंबईत पोषक वातावरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाबा रामदेव म्हणाले  की, भारत हा उत्पादनासाठी एक चांगले क्षेत्र बनू शकतो. जर वाजवी दरांमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी चांगल्या जागा उपलब्ध झाल्या तर भारत मॅन्युफॅक्चरिंग हब देखील बनू शकेल. अनेक कंपन्यांना भेडसावत असलेल्या समस्या बघता बँकांनीही पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बाबा रामदेव यांनी दोन महिन्यांपूर्वी पतंजलिसाठी विदेशी भांडवल आणि स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी हे दोन्ही पर्याय स्वीकारणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, येत्या एक ते दोन वर्षात उत्पन्नाच्या बाबतीत हिंदुस्थान लीव्हरला मागे टाकण्याची व या क्षेत्रातला जगातला पहिल्या क्रमांकाचा ब्रँड पाच ते सहा वर्षांमध्ये बनवण्याची महत्त्वाकांक्षा रामदेव यांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : सेन्सेक्स ३६ हजाराकडे, निफ्टी १०,८०० जवळ