पाताळ भुवनेश्वर गुहेत आहे सृष्टीच्या निर्मितीपासून अंताची माहिती!

patal-bhuvaneshwar

पिथौरागढ : उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यामध्ये असलेल्या ‘पाताळ भुवनेश्वर’ गुहेत सृष्टीच्या निर्मितीपासून अंतापर्यंतची माहिती मिळते.  ही गुफा उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ जिल्ह्यामधील गंगोलीहाटपासून १६ कि. मी. दूर डोंगररांगांमध्ये आहे.

या गुहेचा उल्लेख स्कंद पुराणातदेखील आहे. तिला धार्मिकदृष्ट्या महत्त्व  आहे. समुद्रसपाटीपासून १६५० मीटर उंच असलेल्या या गुहेत शंकराचा वास आहे, अशी श्रद्धा आहे.

cave-templeगुहेत चार युगांचे – सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगांचे प्रतीक चार  दगड आहेत. यातील तीन दगडांचा आकार बदलत नाही.

मात्र कलियुगाचे प्रतीक मानण्यात आलेल्या दगडाची उंची हळूहळू वाढत असते. या दगडावर, छताला एक पिंड असून तिची  लांबी सात कोटी वर्षांत एक इंच वाढते, असे येथील पुजारी सांगतात.

ज्या दिवशी कलियुगाचे प्रतीक असलेला दगड आणि छताला असणारी पिंड एकमेकांना टेकतील, त्या दिवशी कलियुग संपेल आणि पृथ्वीवर महाप्रलय येऊन सृष्टीचा अंत होईल, अशी श्रद्धा आहे.

काळजीचे कारण नाही, प्रलयाला अजून कित्येक कोटी वर्षं  बाकी आहेत !

ही बातमी पण वाचा : विठ्ठलाची शासकीय पूजा इंग्रजांच्या काळातही व्हायची