पॕट कमिन्सची एकाच सामन्यात जमिन-अस्मान कामगिरी

Pat Cummin

मुंबई इंडियन्सने (MI) नेहमीप्रमाणे बुधवारच्या सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मात दिली. केकेआरसाठी या सामन्यात शिवम मावीची (Shivam Mavi) गोलंदाजी सोडली तर विशेष लक्षात रहावी अशी कोणतीही गोष्ट नव्हती पण त्यांनी तब्बल साडेपंधरा कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलेला आॕस्ट्रेलियन खेळाडू पॕटरसन कमिन्सची (Patterson Cummins) कामगिरी मात्र चर्चेचा विषय जरुर ठरली.

कमिन्स गोलंदाजीत अतिशय महागडा तर ठरलाच पण अपयशीसुध्दा ठरला. त्याच्या तीन षटकात 49 धावा बदडल्या गेल्या आणि त्याला एकसुध्दा गडी बाद करता आला नाही. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सर्वात महागडा गोलंदाजसुध्दा ठरतोय अशा काॕमेंटसुध्दा झाल्या.

नंतर फलंदाजीत कमिन्सने आपल्या तडाखेबंद फलंदाजीने टीकाकारांना उतर दिले. त्याने 12 चेंडूतच चार षटकारांसह 33 धावा फटकावून काढल्या. हे चारही षटकार त्याने कुण्या साध्या सुध्या नाही तर जसप्रीत बूमरा सारख्या कसलेल्या गोलंदाजाला एकाच षटकात लगावले आणि जसप्रीत बुमराला एकाच षटकात चार षटकार लगावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

या कामगिरीसह त्याने एकाच सामन्यात अतिशय सुमार ते अगदी नंबर वन असे जमीन-अस्मानाचे टोक गाठले.

आयपीएलमध्ये एकाच सामन्यात फलंदाजीत 250 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा करणारा आणि त्याच सामन्यात गोलंदाजीत 15 धावांपेक्षा अधिकच्या महागड्या इकॉनाॕमीने धावा देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. किमान 12 चेंडू फलंदाजी व 12 चेंडू गोलंदाजी करणारांत कुणीच याबाबतीत कमिन्सच्या पुढे नाही.

कमिन्सच्या 12 चेंडूत 33 धावा विशेष यासाठी की ज्या सामन्यात सुनील नरीन, आंद्रे रसेल व इयान माॕर्गनसारखे फलंदाज एकत्रित 41 चेंडूत 36च धावा करू शकले तिथे त्याने 12 चेंडूत 33 धावा केल्या. एकाच सामन्यात त्याची 16.33 ही गोलंदाजीतील सर्वात खराब इकाॕनामी ठराली तर 275 चा स्ट्राईक रेट ही सर्वात वेगवान फलंदाजी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER