कागदी चिटोऱ्यापासून बायोमॅट्रीक प्रणालीपर्यंत ‘असा’होता पासपोर्टचा प्रवास!

Maharashtra Today

कोरोना (Corona)काळात लॉकडाऊनमुळं (Lockdown) सारेच घरात आहेत. बऱ्यापैकी वाहतूक बंद आहे. लॉकडाऊन उठलं की पुन्हा जनजीवन सामान्य होईल. प्रवासाला कोणतीच अडवून राहणार नाही. ज्यांना विदेशवारी करायची आहे त्यांच स्वप्न पुर्ण होईल. यासाठी भरपूर पैसे आणि त्यासोबत महत्त्वाची लागणरी गोष्ट म्हणजे ‘पासपोर्ट.’ (Passport)एखाद्या देशाच्या सीमेत प्रवेश करायचा झाला तर पासपोर्ट गरजेचाच असतो. राजा महाराजांच्या काळापासून ते पहिल्या महायुद्धापर्यंत मोठ्या प्रमाणात पासपोर्टचा वापर झाला. चला तर मग जाणून घेऊयात ‘राजपत्र’ (Rajpatra) ते मॉडर्न बायोमॅट्रीकचा (Biomatric)कसा होता प्रवास.

हिब्रु बायबलमध्ये आढळतो पहिला उल्लेख

प्राचिन काळीसुद्धा पासपोर्ट नावाची संकल्पना अस्तित्त्त्वात होती. या प्रकारचे दस्ताऐवज वापरल्या गेल्याचे उल्लेख हिब्रु बायबलमध्ये आढळतात. या कागदपत्राच्या वापरामुळं सुरक्षित यात्रा व्हायची असं लिहण्यात आलंय. फारसचा राजा नेहेमियाह याच्या नावाने इसवी सन पुर्व ४५० वर्षांपूर्वी हा कागद जारी करण्यात आला होता. नेहमियाहला जेरुसलेमच्या पुनर्निमाणासाठी यात्रा करायची होती. त्याच्या यात्रेत कोणतीच बाधा येऊ नये यासाठी हा कागद देण्यात आला होता. वाटते लागणाऱ्या प्रत्येक राज्याच्या सैन्यअधिकाऱ्यासाला दाखवण्यासाठी हा कागद होता.

पहिल्यांदा पासपोर्ट नावाची संकल्पना तेव्हा वापरल्याची इतिहासत नोंद आहे. याशिवाय शेक्सपीअरच्या नाटकातही याचा उल्लेख आढळतो. याच नाटकात पहिल्यांदा ‘पासपोर्ट’ हा शब्द वापरण्यात आला.

फ्रान्स, ब्रिटन आणि रशियात झाला वापर

मुळ फ्रेंच शब्द असलेल्या पासपोर्ट या शब्दाचा अर्थ ‘एखाद्या पोर्ट(जहाजाच्या बंदराहून) दुसऱ्या बंदरापर्यंत प्रवास करणे’ असा त्याचा अर्थ होतो. मध्यकालीन युरोपात प्रवाशांसाठी स्थानिक अधिकारी कागदपत्र लागू करायचे. यामुळं रात्रीच्यावेळी प्रवास करताना सीमाभागातील तैनात शिपायी प्रवशांची वाट अडवू शकणार नाही. हे पत्र पंधराव्या लईने स्वाक्षरी केले होते. याशिवाय ब्रिटनच्या हेनरी राजाच्या शासन काळात तिथल्या संसदेनं विदेशी नागरिकांसाठी ब्रिटनमध्ये पासपोर्ट सक्तीचा केला होता. सन १५४० मध्ये ‘प्रिव्ही काऊंसिल’द्वारे प्रदान केला सर्वात पहिल्यांदा पासपोर्ट प्रदान केला गेला. यानंतर रशियाचा झार (राजा) पीटर यानं १७१९ मध्ये पासपोर्ट चलनात आणला. सैन्य सेवा,कर यांच्यासाठी पासपोर्टचा वापर रशियात करण्यात आला.

पहिलं महायुद्ध

फ्रान्स स्वातंत्र्य आंदोलनावेळी पासपोर्टची प्रथा बंद झाली. फ्रान्स क्रांतीनंतर पुन्हा १८ व्या शतकात पुन्हा पासपोर्ट प्रणाली सुरु करण्यात आली. औद्योगिक क्रांतीनंतर पहिल्यांदा प्रवासी कागदपत्राची निकड भासू लागली. याशिवाय युरोपातला पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत झाला. फ्रान्समध्ये रेल्वेच जाळं पसल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा तपास करणं निराधार वाटू लागल्यामुळं १८६१मध्ये पासपोर्ट सिस्टीम रद्दपात्र करण्यात आली. फ्रान्सच्या या निर्णयाचा इतर देशांनी स्वागत करत अनुकरण केलं.

यानंतर पहिल्या महायुद्धा दरम्यान पासपोर्टचा पुन्हा वापर होऊ लागला. पहिल्या महायुद्धानंतर युरोपातल्या अनेक राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून गुप्हेरांपासून वाचण्यासाठी पासपोर्ट सक्तीचे करण्यात आले. ब्रिटनमध्ये पहिला अधुनिक पासपोर्ट सर्वात आधी १९१४ मध्ये वापरण्यात आला. आठ घड्या घातलेला पासपोर्ट हा एक कागद होता. या कागदावर शरिराची वैशिष्ट्ये जसे की रंग,उंची,चेहरा इत्यादीबद्दल उल्लेख असायचा. १९४७ मध्ये आंतराराष्ट्रीय हवाई उड्डाण संस्थेनं पासपोर्ट लागू करण्या संबंधित जबाबदारी घेतली.

बायोमेट्रीक पासपोर्ट

आज जगभरता बायोमॅट्रीक पासपोर्टची चलती आहे. सर्वात आधी मलेशियात १९९८मध्ये बायोमॅट्रीक पासपोर्ट वापरण्याच्या चलनाला सुरुवात झाली.२०१६ नंतर अमेरिकेनं बायोमॅट्रीक पासपोर्टची सक्ती केली. जगभरातल्या सर्वच देशांनी बायोमॅट्रीक पासपोर्ट वापराला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button