साउथच्या सिनेमात न्यूड सीन देणारी अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका

amala-paul-parveen-babi

परवीन बाबी (Parveen Babi)बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय, सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री. 70 चे दशक परवीन बाबीने गाजवले होते. त्या काळातील ती सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. बॉलिवूड नायिकांना मादक रुपाचे दर्शन परवीन बाबीनेच घडवले होते. साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज आणि अतिशय आखुड, घट्ट कपडेही सर्वप्रथम परवीन बाबीनेच बॉलिवूड नायिकांना दाखवले असे म्हणतात. मात्र सौंदर्याला शाप असतो म्हणतात ते परवीनबाबतही खरे झाले असे म्हटले तर वावगे ठरणार आहे. यशाच्या शिखरावर असताना परवीन एक हक्काचा साथीदार शोधत होती. पण काही जणांनी तिचा गैरफायदा घेतला त्यामुळे ती स्किजोफ्रेनियाची शिकार झाली होती. तिच्या जीवनात आलेल्या पुरुषांमध्ये महेश भट्ट, डॅनी, कबीर बेदी या नावांसोबतच अमिताभचेही नाव घेतले जाते. अमिताभ तिला मारण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोपही परवीनने केला होता. तिची मानसिक स्थिती अत्यंत वाईट झाल्याने तिला एका रुममध्ये बंद करून ठेवण्यात आले होते आणि यातच तिचा मृत्यू झाला होता.

महेश भट्ट आणि परवीन बाबी यांच्यात अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. महेश भट्ट यांनी परवीन बाबीला अत्यंत जवळून पाहिले असून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तिच्या संपर्कात होते. याच परवीन बाबीच्या जीवनावर महेश भट्ट एक वेब सीरीज तयार करणार आहेत. परवीन बाबीची भूमिका करण्यासाठी अनेक नायिकांच्या नावाचा विचार सुरु होता. परंतु आता बॉलिवूडमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश भट्ट यांनी परवीन बाबीची भूमिका साकारण्यासाठी साऊथची नवी आणि बिनधास्त नायिका अमला पॉलची (amla paul ) निवड केली आहे.

अमला पॉलने मल्याळम सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली होती. ‘नीलमथारा’ नावाच्या या सिनेमात मोहनलाल तिचा नायक होता. हा सिनेमा हिट झाला होता. मात्र अमलाची ओळख ‘अदाई’ सिनेमामुळे आहे. याचे कारण म्हणजे या सिनेमासाठी तिने न्यूड सीन दिला होता. तिच्या या धाडसामुळे अनेक जण अवाक झाले होते. 2019 मध्ये अमलाचा हा सिनेमा आला होता. या सिनेमात अमला पॉल ने अशा एका मुलीची भूमिका साकारली होती जी एका रात्री अचानक गायब होते. या सिनेमासाठी अमलाने न्यूड सीन दिला. त्याबाबत बोलताना अमलाने सांगितले, न्यूड सीनच्या शूटिंगच्या दिवशी सेटवर जवळ जवळ 15 लोक उपस्थित होते. खरे तर हा सीन करण्याचे मला धाडस होत नव्हते. सेटवर कोण असेल आणि नक्की सीन कसा शूट केला जाणार आहे याची सगळी माहिती मी दिग्दर्शक रत्ना कुमारकडून घेतली. रत्ना कुमारने मला स्पेशल कॉस्ट्यूम वापरण्याची परवानगी दिली होती पण मी विदाऊट कॉस्ट्यूम सीन देण्याचा निर्णय घेतला. हा सीन खूपच गाजला आणि माझा सिनेमाही गाजला असेही अमलाने सांगितले. अमला सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे.

अमलाच्या या इमेजमुळेच महेश भट्ट यांनी परवीन बॉबीच्या भूमिकेसाठी तिची निवड केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER