… या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचे रक्त; नातवाने शेअर केल्या कार्यकर्त्याच्या शरद पवारांबद्दलच्या भावना

Rohit Pawar about Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीसाठी सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शरद पवार यांच्याबद्दल एका कार्यकर्त्यानं व्यक्त केलेल्या भावना शेअर (Emotional-letter) केल्या आहेत. शरद पवार होणं हे कुणाचंही काम नाही, अशा भावना एका कार्यकर्त्यानं व्यक्त केल्या आहेत.

या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश रेखांशावरील माती, किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापुरचा महापूर.. संकटांच्या मानगुटीवर उभं राहून दिलासा द्यायला हेच पाय धावले, याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा, खांद्यावर आलं कितीही ओझं, तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार, किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे,” अशा शब्दांत एका कार्यकर्त्यांनं आपल्या भावना व्यक्त केल्याचं रोहित पवारांनी शेअर केलं आहे. “हे पाय आहेत जमिनीवरचे… आणि याच जमीनीतील मातीचा टिळा आहे भाळी, त्यामुळं आज दुखलेत, सुजलेत, रक्ताळलेत, पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी, कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचे रक्त जे कधीच आटणार नाही,” अशाही भावना त्या कार्यकर्त्याने व्यक्त केल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद ; राष्ट्रवादीच्या नेत्याची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button