विमानाला पक्ष्याची धडक; इंजिन पेटले

नवी दिल्ली :- अहमदाबादवरून बेंगळुरूसाठी उड्डाण केलेल्या गो एअरच्या विमानाला पक्षी धडकला. विमानाच्या एका इंजिनात फसला. इंजिनाला आग लागली. वैमानिकांनी विमानाचे उड्डाण थांबवले; सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले.

अवैध गुटख्यासंबंधी तातडीने माहिती देण्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

दुपारी गो एअरचे जी-८८०२ हे विमान अहमदाबादहून बेंगळुरूला  जाण्यासाठी उड्डाण करत असताना एक पक्षी विमानाच्या इंजिनाला धडकल्याने इंजिनाने पेट घेतला. वैमानिकाने उड्डाण रोखले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. गो एअरच्या प्रशासनाने बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली. गो एअरच्या इंजिनीअरिंगची टीम विमानाची तपासणी करत आहे.