नागपुरात राष्ट्रवादीत इनकमिंग, उद्या अजितदादांच्या हस्ते काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश 

Ajit Pawar

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. राज्यातील अनेक भागात इतर पक्षातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसून येत आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच राष्ट्रवादीने लक्ष्य केंद्रित केले आहे. उद्या राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागपुरातील काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा सुरु आहे.

या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला. प्रदेशाध्यश्र जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड विदर्भ दौऱ्यावर होती. ही यात्रा नागपुरात आली असता आभा पांडे, सतीश होले आणि मोहम्मद जमाल या नगरसेवकांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर हे नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता मात्र या नगरसेवकांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.

उद्या (७ फेब्रु)ला  सायंकाळी आभा पांडे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित राहणार आहे. यावेळी नगरसेवक सतीश होले आणि मोहम्मद जमाल यांचाही पक्षप्रवेश होण्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्यानंतर सायंकाळी शहर कार्यालयात इतर पक्षातीलकार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER