बिहार निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा होकार, शिवसेना बाजी मारेल – संजय राऊत

Uddhav Thackeray-Sanjay Raut-Bihar Election

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar elections) पडघम वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. विशेष म्हणजे बिहारच्या निवडणुकीत शिवसेना पक्षही उतरण्याच्या तयारीत आहे. याबाबतचे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीतही शिवसेना बाजी मारेल. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या बिहार युनिटने (Shivsena Bihar Unit) राज्यातील निवडक ५० जागांसाठी उमेदवार उभे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल. मंथन सुरूच आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बिहार निवडणूक लढविण्यास संमती दिल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बिहार शिवसेना पक्षप्रमुख कौशलेंद्र शर्मा यांनी पक्षाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. पक्ष आपल्या हिंदुत्ववादी विचारधारेवर उभा आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. गेल्या वेळी शिवसेनेने बिहारमध्ये ६० जागा लढवल्या होत्या.

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER