सीएए-एनआरसीविरोधात उद्धव ठाकरेंना ठराव मांडायला लावू : काँग्रेस

Congress will convince Uddhav Thackeray, says Maharashtra MLA (Niranjan)

मंगळुरू :- नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसची पंचाईत झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे शुक्रवारी भेट घेतली होती. या भेटीनंतर सीएएमुळे घाबरू नये, असे सांगत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारची बाजू उचलून धरली.

सीएए आणि एनपीआर यांची अंमलबजावणी करू, असे ठाकरे या भेटीत म्हणाले होते. आता, विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सीएए, एनपीआर आणि एनआरसीविरोधात ठराव मांडण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजवून सांगू, असे बांद्रा (पूर्व) येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

मुंबईत अनेक वसाहतींबाहेर लागत आहेत सीएएला समर्थन देणारे फलक

मंगळुरू येथे खाजगी दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलताना सिद्दिकी यांनी हे वक्तव्य केले. सीएए, एनपीआर आणि एनआरसी या तिन्ही बाबींबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजावून सांगण्याची गरज आहे, असे सिद्दिकी म्हणाले. सीएएबाबत महाविकास आघाडीमधील सहभागी पक्षांची बैठक तातडीने बोलविण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.