पुण्यात सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन; आढावा बैठकीत निर्णय

Pune Lockdown

पुणे :- शहरातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळे, हॉटेल सेवा सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढचे सात दिवस हे नियम लागू राहतील.

काय बंद राहणार?
१) पुण्यात सर्व हॉटेल, रेस्टारंट, बार हे पुढील सात दिवस बंद.
२) मॉल, सिनेमा हॉल आणि सर्व धार्मिक स्थळे बंद.
३) PMPML बससेवा बंद… मात्र अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरू राहील.
४) सर्व आठवडी बाजारही बंद राहतील.
५) सामाजिक, राजकीय कार्यक्रम घेता येणार नाहीत. संध्याकाळी ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असेल आणि दिवसा जमावबंदी राहणार आहे.
६) शाळा, महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

काय सुरू राहणार?
१) लग्न सोहळ्याला ५० जणांना उपस्थितीस परवानगी राहील.
२) अंत्यविधीला २० लोकांना उपस्थितीस परवानगी राहील.
३) केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
४) हॉटेल आणि मात्र पार्सल सेवा सुरू राहील.
५) जिम सात दिवस सुरू राहील.
६) दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत.

परिस्थिती गंभीर
आयुक्त सौरभ राव म्हणाले की, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट ३२ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आठ हजारांवर गेला आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोविड सेंटर करावे लागेल. कोरोनाग्रस्त वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे १०० टक्के कोविड सेंटर करावे लागतील. बेडची संख्या वाढवणार, टेस्टिंग वाढवले जाईल. इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील १० दिवसांत शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसांत ७५ ते ८० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या तीन-चार दिवसांत एक लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.”

ही बातमी पण वाचा : येत्या १५ ते २० दिवसात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button