मराठा आरक्षणाबाबत पार्थची भूमिका वैयक्तिक, अजित पवारांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar - Parth Pawar

पुणे : बीडमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी ट्विट केलं होतं. विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली. मात्र ही त्याची वैयक्तिक भूमिका असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

पार्थ पवार यांनी ट्विट करत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला असून त्यांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना यासंबंधी विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो असं सांगत ही राष्ट्रवादीची (NCP) भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं.

ते म्हणाले की, “ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात. तुम्ही तुमची मुलं काय ट्विट करतात हे पाहता किंवा विचारतात का? असा उलट प्रश्न केला. यातून त्यांनी आपण पार्थ पवार यांच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नसल्याचंच सूचकपणे सांगितलं आहे. ती त्याची वैयक्तिक भूमिका आहे. ती पक्षाची भूमिका नाही प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले की, जो तो स्वतंत्र विचाराचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER