पार्थीव पटेल म्हणतो, ‘त्यांनी संघातून काढले हा तर माझा सन्मान!

Parthiv Patel

आयपीएल 2021 साठी संघांनी मुक्त करायच्या आणि कायम ठेवायच्या खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने पार्थिव पटेलसारख्या सिनियर खेळाडूला डच्चू दिला आहे. पार्थिवने गेल्या महिन्यातच निवृत्ती जाहीर केली असल्याने आरसीबी त्याला सोडणार हे अपेक्षितच होते. मात्र या निर्णयावर तो नाराज असल्याचे दिसतेय.

2018 च्या सिझनमध्ये पार्थिव पटेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडे आला आणि त्याला सलामी फलंदाज म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याने 20 सामन्यात 526 धावा केल्या आहेत. पण आयपीएल 2020 मध्ये आरसीबीने त्याला एकही सामन्यात खेळवले नाही.

या संदर्भात पार्थिवने एक व्टिट केले आहे त्यातून ही नाराजी उघड झाली आहे. आपल्या व्टिटमध्ये पार्थिवने म्हटलेय की, निवृत्तीनंतर आरसीबीनेही मुक्त करणे हा मोठाच सन्मान आहे. धन्यवाद! @आरसीबी व्टिटस्.

“An absolute honour to be released after being retired . … thank you @RCBTweets”

आरसीबीने मात्र आपल्या अधिकृत वेबसाईटवर पार्थिवसंदर्भात त्याला मुक्त केले असल्याचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी म्हटलेय की सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पार्थिव हा साहजिकच आता संघात नसेल.

निवृत्ती जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थिव पटेल हा प्रतिभा शोधक म्हणून मुंबई इंडियन्सकडे आला होता. पार्थिवने म्हटलेय, मुंबई इंडियन्ससाठी खेळताना भरपूर आनंद आला. या विजेत्या संघासोबतची तीन वर्षे संस्मरणीय राहिली. आता आयुष्यात नवीन अध्याय सुरुकरण्याची वेळ आली आहे.

रॉयल चॅलेंजर्सने पार्थिवशिवाय मोईन अली, आरोन फिंच, ख्रिस मॉरिस, इसुरु उदाना, उमेश यादव, शिवम दुबे, गुरुकिरत मान, पवन नेगी व डेल स्टेन यांनासुध्दा मोकळे केले आहे.

ही बातमी पण वाचा : रवी सरांनी संघाचे मनोधैर्य कधीही खचू दिले नाही – विहारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER