शरद पवारांकडून पार्थच पुनर्वसन, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची उमेदवारी देणार ?

Sharad Pawar - Parth Pawar

पंढरपूर :- पंढरपूर (Pandharpur) विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचा काही दिवसांपूर्वीच कोरोनाने (Corona) मृत्यू झाला होता. त्यामुळे या मतदार संघात लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीत पार्थला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीच्या (NCP) स्थानिक नेते अमर पाटील शरद पवार याना दिले आहे. त्यामुळे यावेळी शरद पवार पार्थला उमेदवारी देणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भालके यांच्या निधनानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकोली या गावी येऊन भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं होतं. त्यानंतर दोन दिवसानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र पोटनिवडणुकीत कोणाला उमेदवारी देणार याबाबत पवारांनी कुठलेही भाष्य केले नव्हते. मात्र याठिकाणी पार्थला उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार हे दोघेही मिळून पंढरपूरचा विकास करतील असे मतही त्यानी व्यक्त केले आहे. तसेच प्रशांत परिचारक यांचा पाठिंबा मिळण्यास कुठलीही अडचण नसल्याने शरद पवार पार्थला उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चाही रंगू लागली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘शरद पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊतांनी आग्रह करावा’ – मुनगंटीवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER